महापालिकेच्या गलथान नियोजनामुळे सोसायट्यांसाठीचा `वर्कशॉप` फ्लॉप गेला

0
371

– माहिती, चर्चा करण्याएवजी पथनाट्य दाखवल्याने पालिकेचा निषेध करून सर्वांचा सभात्याग

वाकड, दि. ८ (पीसीबी) : ओला कचरा जिरवण्याच्या अत्यंत ज्वलंत विषयावर आयोजित महापालिकेचा वर्कशॉप अक्षरशः फ्लॉप शो ठरला. दोन तास शहरातील सोसाट्यांचा ओला कचरा समस्येबाबत सोसायसाठी पदाधिकारयांसाठी महापालिकेच्या वतीने ओला कचरा व्यवस्थापन यावरील वर्कशॉपचे शनिवारी सांगवी येथील निळू फुले सभागृहात ११ ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले होते. मात्र साडे बारा पर्यंत एकही अधिकारी येथे न फिरकल्याने सोसायटी रहिवाशांनी सभा त्याग करत महापालिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. नाराज सभासदांनी निघून जाणे पसंत केले.

या कार्य शाळेला महापालिका आयुक्त शेखर सिंह व संबंधित विभागाचे अन्य अधिकारी मार्गदर्शन करणार होते. कार्यशाळेची वेळ ११ ते १ अशी होती त्यास सुट्टीच्या दिवशी शहरातील सुमारे ४० सहुन अधिक सोसायट्यांचे पदाधिकारी वेळ काढून साडे दहा वाजताच हजर झाले होते मात्र, १२.३० पर्यंत एकही अधिकारी सभागृहात उपस्थित न राहिल्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचा निषेध करत काढता पाय घेतलारागाने घर गाठले.

सोसाट्यांच्या कचरा समस्येबाबत महापालिकेला गांभीर्य नाही आता तर या अधिकाऱ्यांना सोसायटी धारकांच्या वेळीचीही किंमत नाही त्यांना आमचे कसलेही सुख दुःख नाही. आता पिंपरी-चिंचवड मधील सर्व सोसायटीधारकांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे सोसायट्यात एकी नसल्याने महापालिकेकडून अशी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे असे पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधी बरोबर बोलताना सांगितले.

मूळ कार्यक्रम पत्रिकेनुसार ११ वाजता अधिकारी या विषयावर निवेदन करणार होते, परंतु १२ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू झाला नाही. अखेर उपस्थितांनी आरडाओरडा केल्यावर वेळ घालविण्यासाठी पथनाट्य सुरू कऱण्यात आले. ते पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. आम्ही नाटक पाहायला आलो नाही, मुद्याचे बोलायला आलोत, असे म्हणत अनेकांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर हल्ला सुरू केला. मुख्य संयोजक सहआयुक्त अजय चारठणकर हे थेट १ वाजता सभागृहात आले. त्यावेळी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी निषेध करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि काढता पाय घेतला.