महापालिकेच्या आयुक्तांना दृष्टीदोष झाल्याची संभाजी ब्रिगेडला शंका

0
178

पिंपरी, दि. (पीसीबी)-वाकड येथील जवळपास पंधरासे कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळात विरोधी पक्षाने आवाज उठवला सरकारने त्या प्रकल्पाला स्थगिती आदेश दिला आहे. संभाजी ब्रिगेड,विविध पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत.

संबंधित मुख्य सूत्रधार प्रसाद गायकवाड यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने महापालिकेसमोर धरणे आंदोलनही केले होते. वेळोवेळी अनेक वेळा निवेदने देवूनही महापालिका आयुक्तांनी दोषी अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई केली नाही म्हणून मंगळवार दिनांक ६/२/२०२४ पासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेच्या बाह्य गेट समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु महापालिकेचे आयुक्त दररोज याच गेटमधूनच बाहेर जात असतात परंतु महापालिकेच्या गेटसमोरच दहा दिवसांपासून सुरू असलेले दहा बाय बाराचे स्टेज आणि मांडव टाकून सुरू असलेले साखळी उपोषण आयुक्तांना दिसले नाही जर दिसले असते तर आयुक्तांनी किंवा महापालिकेच्या इतर अधिकार्यांनी संभाजी ब्रिगेडच्या साखळी उपोषणाची दखल घेऊन चौकशी केली असती परंतु महापालिकेच्या आयुक्तांची डोळ्याची नजर कमी झाल्याने महापालिकेच्या गेट समोरील साखळी उपोषण न दिसल्यामुळे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या डोळ्यांना दृष्टीदोष झाला असावा किंवा मोती बिंदू होऊन नजर कमजोर झाली असावी असा समज संभाजी ब्रिगेडचा झाला असून.

त्यामुळे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा दृष्टीदोष दूर व्हावा आणि त्यांची नजर वाढावी म्हणून आणि संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी मंगळवार दिनांक २०/२/२०२४ रोजी दुपारी तीन वाजता संभाजी ब्रिगेड शिष्टमंडळासह आयुक्तांना जाड भिंगाचा चष्मा भेट देणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी महापालिका आयुक्त तसेच पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.