महापालिकेचे बंद वाचनालय गर्दुल्यांचा अड्डा, हाटकणाऱ्या नागरिकाला टोळक्याकडून मारहाण

0
327

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – चिंचवड, कृष्णानगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बंद वाचनालय गर्दुल्यांचा अड्डा बनत आहे. तेथील मुलांना एका नागरिकाने हटकले असता टोळक्यानेच त्या नागरिकाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.4) घडली.

याप्रकरणी आकाश आनंद पवार (वय 32 रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी योगेश पवार, अनिकेत शिंदे, धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णानगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वर्तमानपत्राचे वाचनालय बंद पडले आहे.याच छिकाणी परिसरातील काहीमुले नशापाणी व गोंधळ घालत असतात. फिर्यादी यांनी त्यांना हटकले असता मुलांनी फिर्यादीच्या घरी जावून त्यांना आम्हाला बसू का देत नाही म्हणून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. व हाताने मारहाण केली. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.