महापालिकेचे निवृत्त अधिकारी राजेंद्र शिंदे यांचे निधन

0
99

पिंपरी, दि. ३ –
पिपरी चिंचवड महापालिकेचे निवृत्त अधिकारी राजेंद्र दिगंबर शिंदे (वय-५९) यांचे सोमवारी (२ सप्टेंबर) सकाळी ७ वाजत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातवंड असा परिवार आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागात सलग ३० वर्षे ते सेवेत होते. तीन महिन्यांपूर्वीच ते सेवेतून निवृत्त झाले होते. पिंपरी चिंचवड तिळवण तेली समाजाचे प्रमुख मार्गदर्शक वधू-वर मेळावा, विद्यार्थी गुणगौरव आदी उपक्रमांत त्यांचा कायम सक्रीय सहभाग असायचा.