महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय सेवानिवृत्त

0
418

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्यासह जुलै 2022 अखेर सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, मनोज माछरे, चारुशीला जोशी, गणेश लोंढे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आपल्या आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे असा सल्ला अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिला. माहे जुलै 2022 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, कार्यालय अधिक्षक लक्ष्मण काळे, प्रभाकर शेलूकर, कनिष्ठ अभियंता उल्हास भालेराव, उपशिक्षिका कल्पना गोलहार, नयना घोलप, वाहनचालक रामदास गव्हाणे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हंसराज साळवे, मनोरंजन वागतकर, इले. मोटार पंप ऑपरेटर प्रकाश जाधव, मजूर मधुकर जाधव, रखवालदार किशोरीलाल यादव यांचा समावेश आहे.

तसेच जुलै 2022 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये मुख्य लिपिक सुधीर माने, स्टाफ नर्स वनिता माकर, सफाई कामगार सुरेखा वाघचौरे, सफाई सेवक विजेंद्र सौदे, रेखा गोहर, गटरकुली हनुमंत तेलगू यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.