महापालिकेकडे 80 हजार राष्ट्रध्वज शिल्लक; शासनाला करणार परत

0
367

पिंपरी दि. २० (पीसीबी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमासाठी महापालिकेने 3 लाख राष्ट्रध्वज खरेदी केले होते. तर, शासनाकडून 1 लाख असे 4 लाख ध्वज महापालिकेला उपलब्ध झाले होते. यामधील निकृष्ट आणि काही कारणांमुळे 80 हजार राष्ट्रध्वज महापालिकेकडे शिल्लक आहेत. हे ध्वज राज्य शासनाला परत पाठविण्यात येणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर आझादी का महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज उपलब्ध होणार नाही. म्हणून महापालिकेने निविदा प्रसिध्द करून राष्ट्रध्वजाची ठेकेदारामार्फत तीन लाख ध्वज खरेदी करून आलेल्या किंमतीत नागरिकांना विकले. राज्य शासनाकडून 1 लाख ध्वज महापालिकेला मिळाले होते. यामधील बहुतांशी ध्वज निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे 79 हजार 778 राष्ट्रध्वज नागरिकांना विकता आले नाहीत. हे ध्वज महापालिका राज्य सरकारला परत करणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेला एकूण 4 लाख ध्वज उपलब्ध झाले. ठेकेदाराकडून 3 लाख आणि शासनाकडून 1 लाख ध्वज मिळाले. त्यापैकी शासनाकडील 79 हजार 778 ध्वज शिल्लक आहेत.
ठेकेदाराच्या एक ध्वजाची किंमत 24 रुपये होती. तर, शासनाकडून आलेल्या ध्वजाची किंमत 20 रुपये 50 पैसे होते.