महापालिकेकडून शहरातील 2 लाख घरांचा ‘कंटेनर’ सर्व्हे; 15 लाख 68 हजारांचा दंड वसूल

0
190

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत शहरातील 2 लाख 7 हजार 46 घरांची तपासणी करत 10 लाख 54 हजार 952 कंटेनरची तपासणी केली. यामध्ये 4 हजार 533 कंटेनरमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत. 838 टायर आणि भंगार दुकाने, 645 बांधकामांची तपासणी करून 3 हजार 457 कंटेनर रिकामे केले. यामधील 1024 जणांना नोटीसा दिल्या. डास आढळलेल्या घरगुती आणि व्यावसायिक मालमत्तांकडून तब्बल 15 लाख 68 हजार 527 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी करण्यात आली. वाढत्या शहरीकरणामुळे शहर परिसरात हवा-पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घेतले असून, गेल्या काही दिवसांत डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यांतून, तसेच रुग्णालये, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीसा बजाविण्यात येत आहेत.

शहरात डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या सोसायटी, भंगार दुकाने, टायर दुकाने अशा अस्थापनांना 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत 2 लाख 7 हजार 46 घरांची तपासणी करून 10 लाख 54 हजार 952 कंटेनरची तपासणी केली. यामध्ये 4 हजार 533 कंटेनरमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत. 838 टायर आणि भंगार दुकाने, 645 बांधकामांची तपासणी करून 3 हजार 457 कंटेनर रिकामे केले. 1 हजार 514 कंटेनर्समध्ये औषध टाकले. तर 1024 जणांना नोटीसा दिल्या.

आळ्या आढळून आलेल्या घरगुती आणि व्यावसायिक मालमत्तांकडून तब्बल 15 लाख 68 हजार 527 रूपयांचा दंड वसूल केला. घरगुती अस्थापनांना 1 हजार, व्यावसायिक अस्थापनांना 2 हजार तर मॉल, हॉस्पिटल, बांधकाम सुरू असलेल्या इमारत यांना 10 हजारांचा दंड आकारण्यात येतो. शहरात डेंग्यूचे रूग्ण सातत्याने आढळून येत आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महापालिका डास उत्पत्तीचे ठिकाण आढळणाऱ्या आस्थापनांना सुरुवातीला नोटीस देते. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले