महापालिका मोकळ्या जागी वृक्षारोपण करणार

0
134

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, उद्याने तसेच मोकळ्या जागी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याठिकाणी लागवडीसाठी सिझनल रोपे पुरविण्याकामी 32 लाख रुपये खर्च होणार आहेत.

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या  सुमारे 5 कोटी 78 लाख रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे,  जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.  

महापालिकेच्या वतीने तळवडे गायरान गट क्र. 1 येथे शोभिवंत रोपे तयार करून त्यांची  देखभाल करण्यात येणार आहे. याकामी 47 लाख रुपये खर्च होणार आहेत.   ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निगडी येथील पीएमपीएमएल बस डेपोमध्ये बस चार्जिंगकरीता विद्युत पुरवठा घेण्यासाठी अत्यावश्यक तसेच अनुषंगिक कामे करण्यासाठी 4 कोटी 88 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या विषयांसह विविध विभागांच्या तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत  मान्यता दिली.