महापालिका माध्यमिक शाळांसाठी 140 शिक्षकांची मानधनावर नेमणूक करणार; शनिवारी मुलाखती..

0
281

पिंपरी दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी व ऊर्दू माध्यमिक शाळांसाठी 140 शिक्षकांची मानधनावर भरती करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने इच्छुक शिक्षकांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांचे बीएड परीक्षेतील गुण आणि मुलाखतीव्दारे थेट निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांच्या येत्या शनिवार (दि.11) पिंपरीत मुलाखती होणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.

इच्छुकांच्या येत्या शनिवारी संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मुलाखती होणार आहेत. इच्छुकांना अर्ज, मूळ कागदपत्रे आणावी लागणार आहेत. महापालिकेच्या शहरात 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. 13 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आगामी शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मानधनावर शिक्षक भरती करण्याचे नियोजन केले आहे.

बी. एस्सी.बी. एडची-47, बी. ए. बी.एड मराठी विषयाचे-27, बी. ए. बी. एड हिंदी विषय-14, बी. ए. बी. एड इंग्रजी विषय-14, बी. ए. बी. एड इतिहास विषय-5, बी. ए. बी. एड भूगोल विषयाचे 2, बी. पी. एड (क्रीडा प्रशिक्षक) 8 असे 117 शिक्षकांची मराठी माध्यमांसाठी निवड केली जाणार आहे. तर ऊर्दूसाठी 23 अशा 140 शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी शिक्षकांना दरमहा 24 हजार रूपयांचे मानधन देण्यात येणार आहे.