महापालिका प्रभाग तीन की चारचा, आज अंतिम निकाल

0
311

पुणे, दि. १७ (पीसीबी) : पुण्याच्या नवीन प्रभाग रचनेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेत राष्ट्रवादीने याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. हीच प्रभाग रचना चुकीची असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला असून सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती.

राज्यात सत्तांतर झाल्यावर पुणे शहराची प्रभाग रचना बदलून चार सदस्यांचा प्रभाग नवीन सरकारने केला होता. मात्र, ही पद्धत चुकीची असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने कोर्टात याचिका दाखल केली होती.
”न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून कोर्टाचा निर्णय येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक जाहीर होईल. सध्याचे सरकार निवडणूक घेण्यास उत्सुक दिसत नाही. आज अंतिम तारीख निकाल येईल”, अशी अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महानगरपालिकामधील प्रभाग पद्धतीच्या बदलांवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? नवीन प्रभाग रचनेवर कोर्ट काय भूमिका मांडणार? हे आता सुनावणीनंतर समोर येणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकाबाबत देखील कोर्ट काही निर्णय देणार का? हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे.