पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची नगरसेवकसंख्या 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर तब्बल 23 प्रभागात दोन महिला उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘या’ 23 प्रभागात असणार दोन महिला उमेदवार!
प्रभाग क्रमांक 4 – मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरीमध्ये (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 7 – सँण्डविक कॉलनी, रामनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 8 – भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 9 – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 10 – इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 12 – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 13 – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 14 – यमुनानगर, फुलेनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 15 – संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 17 – वल्लभनगर( ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 19 – चिंचवड स्टेशन, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 20 – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 22 – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत (एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 30 – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर ( ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी ( एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती ( ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 40 – पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती (एससी महिला, एसटी महिला), प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क (एसटी महिला, सर्वसाधारण महिला) अशा तब्बल 23 प्रभागांमध्ये दोन महिला उमेदवार असणार आहेत. महिलेसाठी दोन जागा पडल्याने 23 प्रभागातील इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला आहे. त्यांना कुटुंबातील महिलेला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.