महापालिका निवडणूक! ओबीसींसाठीच्या 37 राखीव जागांसाठी शुक्रवारी चिंचवडमध्ये आरक्षण सोडत

0
303

पिंपरी दि. २७ (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसीं)साठी 37 जागा राखीव राहणार आहेत. त्यापैकी 19 जागा महिलांसाठी असणार आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा आरक्षित असणार आहेत. त्यासाठी आरक्षित जागांची सोडत येत्या शुक्रवारी (दि.29) काढली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभाग असून नगरसेवकसंख्या 139 आहे. यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) 11 पुरुष 11 महिला अशा 22, अनुसूचित जमाती (एसटी) 2 महिला 1 पुरुष अशा 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी, ओबीसाठी) 19 महिला 18 पुरुष अशा 37 आणि खुल्या गटासाठी 38 महिला 39 पुरुष अशा 77 जागा अशी वर्गवारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण दिले. त्यामुळे सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे. सर्वसाधारण 114 जागांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ए-फोर साईजच्या को-या कागदावरुन आरक्षणाच्या चिठ्ठया तयार केल्या जातील.  शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढल्या जातील.

सुरुवातीला ओबीसींच्या 37 राखीव जागांसाठी सोडत काढली जाईल. त्यानंतर या 37 जागांमधून महिलांसाठीच्या राखीव 19 जागांसाठी सोडत काढण्यात येईल. शेवटी सर्वसाधारण महिलांसाठीच्या 38 जागांची सोडत काढली जाईल. दरम्यान, एसीसी, एसटीचे आरक्षण कायम राहणार आहे. .अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात  19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14  या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी  44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 एसटी समाजातील पुरुषासाठी राखीव झालेला आहे.