- सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी २५ फेब्रुवारीला
ओबीसी आरक्षण, सदस्य संख्या वाढ, प्रभाग किती सदस्यांचा असावा आदी विविध मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात होँणारी आजची सुनावणी आता २५ फेब्रुवारीला होणार आहे.
महापालिका निवडणूक आज सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार होता, मात्र आता पुन्हा तारिख पडली आहे. पुढची तारीख मिळाली आणि तब्बल महिनाभराने म्हणजे २५ फेब्रुवारी ला पुढची सुनावणी होणार आहे.
दरम्यान, जनगणना करण्याच्या जोरदार हालचाली सुर असल्याने महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका आता किमान वर्षभर होणार नसल्याचे समजते. विविध ५७ वेगवेगळ्या याचिकांवर एकत्र सुनावणी होणार होती ती पुढे गेल्याने आता किमान वर्षभर निवडणुका होण्याची शक्यता नाही, असे जाणकारांचे मत आहे.