पिंपरी-चिंचवडमध्ये आप व उबाठा शिवसेनेला मोठे खिंडार
पिंपरी, दि .५ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून आम आदमी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यासह ‘आप’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विभाग प्रमुख प्रदीप महाजन यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात (भाजप) दाखल झाले आहेत.
या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, आमदार हेमंत रासने, आमदार उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, शरद बुट्टे पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आप’मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते
चेतन बेंद्रे, नारायण भोसले, प्रकाश परदेशी, अरुणा सीलम, दत्तात्रय काळजे, जयदीप सूर्यवंशी, कुणाल वाकटे, धनंजय पिसाळ, सुखदेव कराळे, शुभम यादव, अशुतोष शेलके, अतुल ठाकरे, वैभव पाटणकर, नितीश काळे, हरीश जाधव, अक्षय गावंडे, विनील देवरे, सोहन नऱ्हकडे, महेंद्र नागवडे, विपुल घोलप, राहुल नाईक, किरण उघळे, सागर वाघमारे, रुपेश महाडिक, प्रसाद मोरे, श्रीराज पठाण, थोंबरे, गंगा चौधरी, रमेश बन्सोड, सोनार, संकते भोसले, हार्दिक गायकवाड, आरजे जाधव, मनोहर चिकले, मोहन जाधव, जनार्दन कदम, सर्जेराव देखणे, सुमित राक्षे, ठकसेन निकम, अथर्व धावळे, ओम पवार, महेश काळे, सुने बोडारे, यशोधन देशमुख, अर्पित सुतार, विशाल डोंगरे, मोसिन गडकन, सूरज बन्सोडे, शिवकुमार गुप्ता, शंकर बाबू, स्वप्नील बेंद्रे, संदीप काशीद, सचिन नागवाड, सतीश सीलम, रामकृष्ण सीलम, प्रकाश तिर्खुंडे.
शिवसेना (उबाठा) गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते पुढीलप्रमाणे
प्रदीप महाजन, देवानंद कापरे, अमोल बोंबले, सुनील साबळे, स्वप्नील ढोमसे, महेश देबडवार, प्रशांत कोतूर, रवी अंबाडकर, आशिष यादव, संजय अंबाडकर, अतुल देवाडीकर, संजय कुलकर्णी, जालिंदर झिंजुरके, मनीष आढाव, अशोक मामीडवार, विवेक मामीडवार, कल्पेश मद्रेवार, अविनाश देवशेटवार, अनिल देवशेटवार, संतोष नलदकर, संतोष गादेवार, दत्ता कामठाणे, कमलेश बंडेवार, संजय वट्टमवार, डॉ. गिरीश गंधेवार, व्यंकटेश महाजन, ज्ञानेश मानकुलवार, नितीन अंजीकर, नितीन भावटणकर, लक्ष्मीकांत कोले, सुनील मरुडवार, राहुल डाचावार, श्रीस्वरूप जोशी, अनिल राठी, डॉ. प्रशांत देशमुख, अवताडे, विजय शहाणे, राजेश घुंगाडे, संदीप अर्थमवार, नरेश कोटगिरे, प्रणिता मद्रेवार, दीपा कामठाणे, सुप्रिया देवशेटवार, अपर्णा देबडवार, गीता कोट्टर, प्रथम महाजन, निखिल शहाणे, अजय पाटील, उज्वला महाजन, प्रशांत देशपांडे.
या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील आम आदमी पार्टी आणि शिवसेना (उबाठा) गटाला मोठा फटका बसला असून, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संघटनात्मक बळात वाढ झाली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढवण्यासाठी ही भर महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.