महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे उद्या शहर दौऱ्यावर; रॅली, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

0
254

पिंपरी दि. १२(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उद्या (शनिवारी) शहर दौऱ्यावर येत आहेत. शहरात रॅली काढणार असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने मनसे वातावरण निर्मिती करणार आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांचे पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारी 3 वाजता सांगवी येथे आगमन होणार आहे. शहरातून दुचाकी रॅली काढणार आहेत. सांगवी फाट्यापासून रॅलीला सुरुवात होईल. सांगवी-रक्षक चौक-काळेवाडी फाटा-16नंबर-डांगे चौक, डांगे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.

तेथुन पुढे डांगे चौक-थेरगाव फाटा-थेरगाव गावठाण-ऐम ऐम कॅालेज, एम एम कॅालेज जवळ काळेवाडी विभागातर्फे स्वागत, एम एम कॅालेज – चित्तराव गणपती रोड मार्गे- केशवनगर शाळा, चिंचवडगाव-जुना जकात नाका-स्पाईन रोड-बिजलीनगर पुल-गुरुद्वारा रोड मार्गे-धर्मराज चौक- आकुर्डी रेल्वे स्टेशन असा रॅलीचा मार्ग असणार आहे. केरला भवन निगडी प्राधिकरण येथे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. तिथे महाविद्यालयीन तरुण तरुणी व पदाधिकारी यांच्याशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.