मुंबई, दि. 1३ (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र तूर्तास तरी महापालिका निवडणुका लागणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखांसदर्भात एक बातमी समोर आली आहे. राज्यात सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, तालुका पंचायत समिती तसेच ग्रामपंयाती मिळून सुमारे आठ हजार आहेत.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिल महिन्यानंतर लागणार का? असा सवाल केला जात आहे. येत्या २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या सुनावणीवर भवितव्य ठरणार आहे. राज्यात लोकप्रतिनिधींच्या ३४ हजार जागा रिक्त असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून निकाल देण्यात आल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका निवडणुक, नगर पंचायती निवडणुक, जिल्हा परिषद निवडणुक आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लागणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग रचना तीन सदस्यांची की चार सदस्यांची हा वाद निकाली व्हायचा आहे. सदस्य संख्या वाढविण्यात आल्याने तिथेही हाविकास आघाडीत सर्व अलबेल आहे असेही नाही. ओबीसी मतदार ही भाजपची व्होट बँक असून अद्याप त्यावर उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे. मुंबई आणि पुणे महाापालिकेला वार्ड फेररचना करावी लागेल, असाही एक अंंदाज आहे. एकूण सदस्य संख्येचा वादसुध्दा निकाली व्हायचा आहे.