महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद मी स्वतः देणार

0
3

पुणे, दि. १५ : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, त्यात महापालिका निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. आगामी काही महिन्यांत या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल? महापौर कोणत्या पक्षाचा असेल? याबाबत सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, गटबाजी, युती-बिघाडी पाहता मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात या निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात मोठ्या प्रमाणावर बैठका, रणनीती ठरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवारांनीही आपले प्रचारकार्य सुरू केल्याचे चित्र अनेक प्रभागांत दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिला आहे.
’स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला पाहिजे’, असा कानमंत्र भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना हा कानमंत्र दिला आहे. तुमच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची पाच कामे सांगा, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. स्थानिक समित्यांचे वाटप करण्याचा सर्व अधिकार तुम्हाला’ आहे, महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद मी स्वतः देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलं आहे. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना स्पष्ट केलं आहे. वर्षावरती झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना या सूचना दिल्या आहेत. आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, योगेश सागर, परिणय फुके, गोपीचंद पडळकर,अमित साटम बैठकीला उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस आगामी काळात विभागवार बैठका घेण्याची शक्यता आहे. काल (सोमवारी, ता14) रात्री उशीरा मरावाड्यातील आमदारांची वर्षावर बैठक पार पडली आहे, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वरचढ ठरला पाहिदे अशा प्रकारची भूमिका ही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्याकडून आमदारांना काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मतदारसंघातील महत्त्वाची कामे, स्थानिक समित्यांचे वाटप असेल हे आधिकार देखील आमदारांना देण्यात आले आहेत त्याचबरोबर महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद मी स्वतः देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलं आहे. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप कामाला लागल्याचं दिसून येत आहे.

निवडणुकीसाठी रा.स्व. संघ दक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघ दक्ष झाल्याचं दिसून येत आहे. भाजप प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुंबई, विदर्भ, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही प्रमुख आमदार बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे, थोड्याच वेळात भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीला सुरुवात होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह संघातील काही प्रमुख पदाधिकारी देखील या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत