महापालिका आयुक्तांनाच डेंग्यूची लागण, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

0
93

पुणे, १९ जुलै (पीसीबी) – शहरात झिका रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक चिंताग्रस्त झाल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणा २४ तास काम करत आहेत. त्यातच पावसामुळे साथीच्या आजारांनी डोकं काढले असून चक्क महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. सध्या डेंग्यूचा प्राथमिक अहवाल निगेटिव्ह आला असला तरी आयुक्तांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यामध्ये डेंग्यूचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो. यंदा डेंग्यूच्या रुग्णाची संख्या आटोक्यात असली तरी झिकाची रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासाची उत्पत्तीच्या ठिकाणाचा शोध घेऊन औषध फवारणी केली जात आहे. डेंग्यूच्या आळ्या आढळणार्‍या सोसायट्या आणि विविध आस्थापनांना पालिकेकडून दंड केला जात आहे. आत्तापर्यंत १०६४ जणांना नोटिसा देण्यात आल्या असून ४ लाख १८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यात डेंग्युसदृश लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे त्यांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्यांचा डेंग्यूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आयुक्तांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.