महापालिका निवडणुका आता पुढच्या वर्षीच

0
337

मुंबई , दि.८ (पीसीबी) -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ही सुनावणी ९ जानेवारीला होणार होती. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात 9 जानेवारीला सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. दरम्यान, आता सुनावणी चार मार्च ला होण्याची शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून यावर कोर्टात सुनावणी झालीच नाही. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळं आता 4 मार्च ला तरी सुनावणी होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.