महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात उद्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम

0
279

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – महाराष्ट्र संपूर्ण देशात वाढलेली महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, त्याच बरोबर केंद्र, राज्य आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमान जनक वक्तव्य, आधीच बरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग-धंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयावर जनतेत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जन जागर यात्रेचे दि. ५ जानेवारी २०२३ रोजी पिंपरी शिववड शहरात आगमन होत आहे यानिमित्ताने जन जागर कोपरा सभेचे आयोजन केलेले आहे.

या जनसागर यात्रे निमीत्ताने डिलक्स चौक, पिंपरी येथे दुपारी ०३:०० वाजता, खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी ०४:३० वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर येथे ०६:०० वाजता या ठिकाणी कोपरासभा आयोजित केल्या असून शहरातील जनसागर यात्रेचा समारोप सभा पी.एम.टी. चौक, भोसरी येथे सायंकाळी ८.०० वाजता होणार आहे.

या जनजागर शाहीसाठी खास LED रथ तयार केला असून भाषणांसाठी स्वतंत्र रथ नियोजित केला आहे, या जनजागरणासाठी खासदार सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ.विद्या चव्हाण, खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, प्रदेश निरीक्षक तथा डौ आशा मिरगे, वैशालीताई नागवडे, शितल हगवणे यासह शहरातील पक्षाचे वरीष्ठ नेते, माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, माजी नगरसेवक – नगरसेविका व सर्व सेलचे पदाधिकारी – कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्ष – सौ.कविता आल्हाट यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे.

देश पातळी, राज्य पातळी त्याचबरोबर शहरातील वरील मुद्यांची दखल घेऊन जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी आपआपल्या भागात या जन जागर यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गव्हाणे आणि सौ आल्हाट यांनी केले आहे.