पुणे, दि. ३० (पीसीबी) ‘सकाळ-साम’च्या माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला सर्वाधिक लोकांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे. ४२.१ टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदी यांना पसंती दिली आहे. राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सकाळच्या राज्यभरातील दोन हजार बातमीदारांनी या महासर्वेक्षणासाठी काम केले. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ, ४८ लोकसभा मतदारसंघातून समाजाच्या सर्व स्तरातून ४९ हजार २३१ जणांचे मत विचारात घेण्यात आले आहे.
सर्वेक्षणाचे निष्कर्ष
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम
2) मोदींनी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली अशी भावना
3) महाराष्ट्रात काँग्रेसचं स्थान बळकट
4) राहुल गांधींची लोकप्रियता वाढली
5) महागाई आणि बेरोजगारी प्रश्न गंभीर
6) भाजप मोठा पक्ष पण महाविकास आघाडी कायम राहिल्यास तगडं आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचं योगदान कोणतं, असं आपल्याला वाटतं?
- भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली : 20.6 टक्के
- सरकारच्या योजना : 4.9 टक्के
- राम मंदिर : 12.9 टक्के
- नोटबंदी : 4.6 टक्के
- कलम 370 रद्द करणं : 11 टक्के
- संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता : 3.5 टक्के
- वरीलपैकी सर्व : 12.2 टक्के
- यापैकी कोणतेही नाही : 16.1 टक्के
- सांगता येणार नाही : 9.7 टक्के
मोदी सरकारचं 9 वर्षातील सर्वात मोठं अपयश कोणतं, असे आपल्याला वाटतं?
- महागाई : 39.3 टक्के
- बेरोजगारी : 18.6 टक्के
- इंधन दरवाढ : 12 टक्के
- सीमा सुरक्षा : 2.6 टक्के
- नोटबंदी : 6.6 टक्के
- कोरोना काळातील नियोजन : 2.3 टक्के
- अपयशी ठरले असे वाटत नाही : 11.5 टक्के
- सांगता येत : 7 टक्के
लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये आपण केलेलं मतदान योग्य ठरलं, असं आपल्याला वाटतं का?
- होय – 53.1टक्के
- नाही – 31.6 टक्के
- सांगता येत नाही – 15.4 टक्के
2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण 2019 प्रमाणेच मतदान करणार आहात का?
- होय – 48.3 टक्के
- नाही – 33.3 टक्के
- सांगता येत नाही – 18.4 टक्के
विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांपैकी कोणत्या आरोपात आपल्याता तथ्य वाटतं?
- नोटबंदी फसली : 15 टक्के
- धार्मिक तेढ वाढली : 9.7 टक्के
- जातीय तणाव : 5 टक्के
- ठराविक उद्योजकांना लाभ : 6.6 टक्के
- बेरोजगारी वाढली: 14.2 टक्के
- अर्थव्यवस्था अडचणीत : 4.1 टक्के
- केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव : 9 टक्के
- संविधानिक मूल्यांची पायमल्ली : 2.2 टक्के
- वरीलपैकी सर्व: 14.6% टक्के
- वरीलपैकी एकही नाही: 19.5 टक्के
2024 ला कोणता पक्ष निवडून यावा, असं आपल्याला वाटतं?
- भाजप : 33.8 टक्के
- काँग्रेस : 19.9 टक्के
- राष्ट्रवादी काँग्रेस : 15.3 टक्के
- शिवसेना (एकनाथ शिंदे) : 5.5 टक्के
- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट : 12.5 टक्के
- शेकाप : 0.7 टक्के
- वंचित बहुजन आघाडी : 2.9 टक्के
- एआयएमआयएम : 0.6 टक्के
- स्वाभिमानी शेतकरी पक्ष : 0.5 टक्के
- भारत राष्ट्र समिती (केसीआर) : 0.5 टक्के
- अपक्ष : 1.7 टक्के
- यापैकी नाही : 5.9 टक्के
विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला द्याल?
- ममता बॅनर्जी : 4.5 टक्के
- राहुल गांधी : 34.9 टक्के
- नितीश कुमार : 4.1 टक्के
- एम. के. स्टॅलिन : 1.8 टक्के
- अरविंद केजरीवाल : 12 टक्के
- के. चंद्रशेखर राव (केसीआर) : 2.9 टक्के
- यापैकी एकही नाही : 23.2 टक्के
- सांगता येत नाही : 16.7 टक्के
2024 लोकसभा 2024 निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असं वाटतं का?
- होय – 42.1 टक्के
- नाही – 41.5 टक्के
- सांगता येत नाही – 16.4 टक्के