महागडे मोबाईल, घड्याळ पॅकिंगमधून काढून ग्राहकांना पाठवले रिकामे बॉक्स

0
289

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिकिंग व पॅकिंग डिपार्टमेंट मधून वस्तूंची पॅकिंग करून ग्राहकांना पाठवले जात असताना पॅकिंग मधून महागडे मोबाईल फोन आणि घड्याळ काढून एका कामगाराने मोकळे बॉक्स ग्राहकांना पाठवले. ही घटना ७ ते १५ एप्रिल या कालावधीत ऍमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा ली आंबेठाण येथे घडली.

सुहेल हरून तांबोळी (रा. सोलापूर शहर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशील उदयसिंहराव गायकवाड (वय ३७, रा. बावधन, ता मुळशी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऍमेझॉन सेलर सर्व्हिसेस कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीतून ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूंना पॅकिंग करून पुढे डिलिव्हरीसाठी पाठवले जाते. आरोपी हा कंपनीत काम करत होता. त्याने ग्राहकांना जाणा-या पॅकिंग वस्तूंची पॅकिंग खोलून त्यातून दोन अॅपल कंपनीचे आयफोन, एक वन प्लस मोबाईल व एक गोकी स्मार्ट वॉच असा एक लाख ८४ हजार ३३८ रुपयांचा माल काढून ग्राहकांना रिकामे बॉक्स डिलिव्हरी साठी पाठवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.