महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता

0
249

– राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा शिवसेना खासदारांची मोठी मागणी

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) : देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केले आहे. तर एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे खासदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी शिवसेनेला केली आहे. दुसरीकडे शरद पवार व विरोधक यशवंत सिन्हा यांना मतदान करण्यास सांगत आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का, असा प्रश्न चर्चेला जात आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या प्रचाराला गती देण्याची चर्चा झाली.

बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे भालचंद्र कांगो आणि आरजेडीचे एडी सिंग उपस्थित होते. यशवंत सिन्हा यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे सुधींद्र कुलकर्णीही चर्चेत होते. विशेष म्हणजे ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या निवासस्थानी झाली.