मला मुस्लिम असल्याची लाज वाटतेय

0
5

दि . २४ ( पीसीबी ) – कश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील दहशतवादी हल्ला पाहिल्यात तब्बल 28 पर्यटकांनी आपला जीव गमावला, त्यानंतर देशभरातील लोकांचा संताप शिगेला पोहोचला. या भ्याड हल्ल्यानंतर अनेक सिनेकलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशातच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही व्हिडीओ शेअर करुन आपला राग व्यक्त केला आहे. अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट यानंही प्रतिक्रिया दिली आहे. सलीमनं एक व्हिडीओ शेअर करुन संताप व्यक्त केलाय. तसेच, प्रसिद्ध गायकानं मला मुस्लिम असल्याची लाज वाटतेय, असं वक्तव्य केलं आहे.

सलीम मर्चंट यानं एक व्हिडीओ शेअर करुन पहलगाम हल्यावर आपलं दुःख व्यक्त केलं. गायक सलीम म्हणालाय की, “पहलगाममध्ये मारले गेलेले निष्पाप लोक मुस्लिम नसून हिंदू असल्यानं मारले गेले? हे मारेकरी मुस्लिम आहेत का? नाही, हे दहशतवादी आहेत. कारण इस्लाम हे सर्व शिकवत नाही. इस्लाम म्हणतो की, धर्माच्या बाबतीत कोणतीही सक्ती नाही. माझ्या हिंदू बंधू-भगिनींना इतक्या क्रूरपणे मारलं गेलं, तो दिवस मला पहावा लागतोय, हे पाहून मला मुस्लिम असल्याची लाज वाटते. फक्त ते हिंदू आहेते म्हणून. हे सर्व कधी संपेल? गेल्या तीन वर्षांपासून शांततेत जगणारे काश्मीरमधील रहिवासी पुन्हा त्याच वादळाचा सामना करत आहेत.”

प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट पुढे म्हणाला की, “माझं दुःख आणि राग कसा व्यक्त करायचा, हे मला समजत नाही. ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावलाय, त्यांच्या कुटुंबीयांना देव शक्ती आणि समृद्धी देवो, असं मी नमन करतो. ओम शांती.

दरम्यान, सलीम मर्चंटच्या या व्हिडीओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एवढंच नाही तर कॉमेडियन मुनव्वर फारुकी यानं सलीम मर्चंटच्या स्टोरीवरचा व्हिडीओ शेअर केला असून ‘फॅक्ट’ असं लिहिलं आहे.