मला मुख्यमंत्री करा – अजित पवार

0
131

मुंबई, दि. १० – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली होती. या भेटीदरम्यान बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार असूनही कमी जागा असणाऱ्या संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची संधी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दिली आहे. तशीच संधी मलाही महाराष्ट्रात द्यावी, अशी इच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे व्यक्त केल्याचं वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने दिलं होतं, यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मी मुंबई विमानतळावर अमित शाह यांची भेट घेतली, बिहार पॅटर्नबाबतच्या बातमीत तथ्य नाही. अमित शहांसोबत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी जाग वाटपावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या बैठकीमध्ये २८८ जगांबाबतचा निर्णय होईल, जागा वाटपाचं फायनल झालं की मी तुम्हाला सांगणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या सतत संपर्कात असतो, राज्याच्या हिताच्या गोष्टी करून घेतो, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.