तळेगाव दाभाडे, दि. २७ : राज्यात महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने मावळ मधील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजपचे नेते बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांच्यातील वाद आता थेट फाईल वॉरपर्यंत पोहोचला आहे. भेगडेंच्या इशाऱ्याला आमदार शेळकेंनी जोरदार आणि थेट उत्तर दिलं आहे. भाजप नेते बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे मावळ मधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मला फाईल उघडायला लावू नका, ताकदीची भाषा करू नका, गावागावांत भांडण लावू नका’ असा थेट इशारा बाळा भेगडे यांनी दिला होता. मात्र या वक्तव्यावर आमदार सुनील शेळके यांनीही तितकंच आक्रमक प्रतिउत्तर दिलं आहे. ज्या ठिकाणी बाळा भेगडे बोलले, त्याच ठिकाणी जाऊन मी त्यांना उत्तर देणार असं म्हणत शेळकेंनी थेट आव्हान दिलं आहे. इतकंच नाही तर भाजप नेते बाळा भेगडे यांच्या आरोपावर उत्तर देताना राष्टवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले ‘ज्याठिकाणी माझ्यावर आरोप केले, त्याच ठिकाणी उत्तर द्यायला जाणार आहे आणि मी पुराव्यानिशी उत्तर देणार आहे. दोन दिवस अजून माझ्या सभेला बाकी आहेत तोपर्यंत काय फाईली जमा करता येईन तेवढ्या करून घ्या आणि मी उत्तर दिल्यावर फाईली ओपन करा’. मी पुराव्यांसह सगळं बाहेर काढणार असं म्हणत शेळकेंनी फाईल वॉरचं बिगुल फुंकलं आहे. या दोन नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे आता पुढील दोन दिवसांत मोठा राजकीय स्फोट होणार का?याकडे संपूर्ण मावळ वासीयांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे मावळ मधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मला फाईल उघडायला लावू नका, ताकदीची भाषा करू नका, गावागावांत भांडण लावू नका’ असा थेट इशारा बाळा भेगडे यांनी दिला होता. मात्र या वक्तव्यावर आमदार सुनील शेळके यांनीही तितकंच आक्रमक प्रतिउत्तर दिलं आहे. आमदार सुनील शेळके म्हणाले ‘ज्याठिकाणी माझ्यावर आरोप केले, त्याच ठिकाणी उत्तर द्यायला जाणार आहे आणि मी पुराव्यानिशी उत्तर देणार आहे. दोन दिवस अजून माझ्या सभेला बाकी आहेत तोपर्यंत काय फाईली जमा करता येईन तेवढ्या करून घ्या आणि मी उत्तर दिल्यावर फाईली ओपन करा’. मी पुराव्यांसह सगळं बाहेर काढणार असं म्हणत शेळकेंनी फाईल वॉरचं बिगुल फुंकलं आहे.



































