`मला फसवून शिंदे गटात नेले, परत शिवसेनेत घ्या`

0
566

– शहर झोपडपट्टी सेनेचे प्रमुख राजू विटकर यांचे उध्दव ठाकरे यांना पत्र

पुणे, दि. २३ (पीसीबी) – आपल्याला नकळत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील करून फसवणूक झाल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेतील झोपडपट्टी सेनेचे विभाग प्रमुख राजू विटकर यांनी केले आहे. या फसवणुकीबद्दलचे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहले आहे. त्याचबरोबर आपली चूक झाली त्याबद्दल मी माफी मागतो असाही उल्लेख पत्रात केला आहे.काही दिवसांपूर्वी पुण्यातील काही लोकांनी शिंदे गटात प्रवेश केला यामध्ये त्यांचाही प्रवेश करण्यात आला होता. मात्र हे नकळत झाल्याची कबुली राजू विटकर यांनी दिली आहे. त्यानंतर मला पुन्हा शिवसेनेत सहभागी करून घ्या असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांनी झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली.

माझी फसवणूक झालेली आहे, आता मी पुन्हा जोमाने काम करणार असून सचिन अहिर आणि नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे अशी मागणी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला गळती लागली आहे. आमदरांसहितल खासदार आणि माजी खासदारांना शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असून