मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लावत होतो …

0
8

बीड, दि. २8 (पीसीबी)
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षातील नेते उपस्थित आहेत. दरम्यान या मोर्चामध्ये बोलताना पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली. आमदार सुरेश धस यांच्याशी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लावत होतो मी कचाकच. मी काही समजत नाही यांना. माझ्या जातीवर अन्याय केला तर मी त्यांना सोडत नाही.’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

‘मी अधिकचं काही बोलणार नाही. मी काय करतो, काय करणार नाही यापेक्षा समाजाने काय ठरवलं त्यात मागे हटणार नाही. अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लावत होतो मी कचाकच. मी काही समजत नाही यांना. माझ्या जातीवर अन्याय केला तर मी त्यांना सोडत नाही.

मला दुसरा एक प्रश्न विचारला. तुम्ही नाव घेत नाही. मी लढत नाही. तुम्हाला काय माहीत आहे का मी लढत नाही. मीच एकट्याने का करावं. सुरेश धस अण्णाच एकटे काफी आहे सर्वांना. जो आमदार, जो खासदार, सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल, जो काँग्रेसचा असो, भाजपचा असो, शिवसेनेचा असो त्याच्या बाजूने जातीच्या सर्व लोकांनी उभं राहायचं. तो कोणत्याही जातीचा असू द्या. त्याचा पक्ष कोणताही असू द्या, त्याच्या पाठीशी उभं राहायला शिका. जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोपर्यंत आपण त्यांच्या बाजूने बोलायचं. जेव्हा ते पक्षाचं बोलायला लागले तर तर त्यांना ढकलून द्यायचं’ असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हात जोडून सांगतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. त्यांना सांगा ज्या ज्या लोकांची नावे यात आली आहेत त्यांना अटक करा. नाही अटक केली तर मी कचाकच घोडे लावेन. मी या लेकराचं तोंड पाहू शकत नाही. तुमचा नेता आमचा नेता नाही. आमचा दुश्मन नाही. विरोधी पक्ष आमचा सासरा नाही. पण या लेकराचं कुंकू पुसलं गेलंय’ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.