पुणे, दि.३० (पीसीबी) : देशातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माता असलेल्या मर्सिडीज बेंझने (दि. 30 सप्टेंबर ) EQS 580 4MATIC च्या स्वरुपात देशातील सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक लक्झरी इलेक्ट्रिक वाहन लाँच करून तिच्या भारतातील प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. EQS 580 4MATIC निर्माण करणारी भारत ही जर्मनी बाहेरची जगातील पहिली बाजारपेठ आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या चाकण प्लांट येथून EQS 580 4MATIC लाँच केली. EQS 580 4MATIC ही मर्सिडीज बेंझची स्थानिक पातळीवर उत्पादित केलेली भारतातील पहिली ईव्ही आणि 14 वी ‘मेड इन इंडिया’ मर्सिडीज-बेंझ मॉडेल आहे. उत्पादनात उदाहरणीय फ्लेक्सिबीलिटी: मर्सिडीज-बेंझ इंडिया आता एकाच छताखाली सिरीज कार्स, एएमजी परफॉर्मन्स कार्स, मेबॅक आणि लक्झरी ईव्ही हे सर्व उत्पादीत करते.
मर्सिडीज बेंझद्वारे ‘मेड इन इंडिया’ EQS 580 मर्सिडीज-बेंझद्वारे 4MATIC लाँच केली; ही लक्झरी ईव्ही निर्माण करणारी भारत जर्मनी बाहेरची पहिली बाजारपेठ ठरली आहे.
भारतातील सर्वात लांब रेंजची ईव्ही ठरलेली EQS 580 4MATIC डिझाइन आणि तंत्रज्ञाना एक चमत्कार आहे आणि ही लक्झरी ईव्ही सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क निश्चित करते. भारतात लक्झरी ईव्ही सादर करून मर्सिडीज बेंझने जागतिक पोर्टफोलिओमधून भारतीय ग्राहकांना सर्वात इष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत, भविष्यागामी उत्पादने ऑफर करण्याच्या तिच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला आहे. EQS 580 4MATIC लाँच करून मर्सिडीज बेंझने नजीकच्या भविष्यात क्लायमेट न्युट्रल कार फ्लीट साध्य करण्याच्या दिशेने जाण्याच्या तिच्या जागतिक दृष्टीकोनावर जोर दिला जातो. EQS 580 4MATIC चे करण्यात आलेले स्थानिक उत्पादन मर्सिडीज बेंझ इंडियाने तिच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेमध्ये फ्लेक्झिबल प्रॉडक्शन साध्य केलेल्या जागतिक क्षमतांना अधोरेखित करते, जी आता एकाच छताखाली सिरीज, मेबॅक, एएमजी आणि लक्झरी इव्हीचे उत्पादन करते.
याप्रसंगी बोलताना मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन वेंक म्हणाले, “EQS 580 4MATIC ही भारतातील आमची स्थानिक पातळीवर उत्पादित केलेली पहिली ईव्ही आहे आणि ही आमच्या महत्त्वाकांक्षी ईव्ही योजनांना देशातील बाजारपेठेत चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. ही कार टेक्नॉलॉजी, लक्झरी आणि सुरक्षिततेचे एक परिपूर्ण मिश्रण आहे आणि ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक टेक फीचर्स सादर करण्यात अग्रगण्य आहे. EQS 580 4MATICची निर्मिती करणारा भारत हा जर्मनीबाहेरील जगातील पहिला देश आहे आणि हा अनोखा फरक मर्सिडीज बेंझ इंडियाच्या ग्राहकबद्दलच्या सखोल वचनबद्धतेला आणि येथील लक्झरी ईव्ही बाजारपेठ विकसित करण्याच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला अधोरेखित करतो.”
ते पुढे म्हणाले, “भारतातील EQS 5804MATIC ची निर्मिती हा आमच्या अत्याधुनिक उत्पादन कौशल्याच्या परीक्षणासंदर्भातील आणि ‘मेक इन इंडिया’च्या दृष्टीकोनासाठीच्या आमच्या वचनबद्धतेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे स्थानिक बाजारपेठ विकसित करणे, ग्राहकांसाठी योग्य मूल्य निर्माण करणे आणि सर्वोत्कृष्ट लक्झरी, तंत्रज्ञान आणि सुरक्षितता यांचा मेळ घालून फ्युचर रेडी उत्पादने सादर करण्याच्या आमच्या अथक लक्ष केंद्रित करण्याला अधोरेखित करते. ‘मेड इन इंडिया’ असलेली ही EQS संपूर्ण भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये खूप उच्च बेंचमार्क सेट केला आहे आणि ती लक्झरी व तंत्रज्ञानाची संयोग घडवून आणते, जे बाजारात इतर आधुनिक ईव्हीकडे उपलब्ध नाही.
* EQS तिच्या 677 किमी (WLTP)/ 857 किमी (ARAI सर्टिफाईड) पर्यंतच्या रेंजसह भारतातील सर्वात लांब रेंजची ईव्ही ठरली आहे.
* EQS 580 च्या उत्पादन प्रक्रियेत नवीन टेक्नॉलॉजिकल इनोव्हेंशन्स अवलंबण्यात आले आहेत.
* MBUX हायपरस्क्रीन सब-असेंबली, बॅटरी आणि इतर ड्राईव्ह ट्रेनच्या सब-असेंबलीसाठी लवचिक उत्पादन संकल्पना, हेड-अप डिस्प्ले आणि ग्रीन चार्जिंग इको-सिस्टमसाठी ऍडव्हान्सड् टेस्ट आणि कॅलिब्रेशन.
* EQS 5804MATIC ही 0.20 च्या ड्रॅग गुणांकासह जगातील सर्वात एरोडायनॅमिक प्रॉडक्शन वाहन आहे. 677 किमी (WLTP ) / 857 किमीपर्यंतच्या (ARAI प्रमाणित) रेंजमध्ये योगदान देते.
* फास्ट चार्जिंग स्टेशनवर केवळ 15 मिनिटांत 300 किमीपर्यंत (WLTP) चार्ज होते.
* MBUX हायपरस्क्रीन: सीरिज-बिल्ट कारमध्ये आतापर्यंत बसविलेली सर्वात प्रगत इन्फोटेनमेंट स्क्रीन, स्टँडर्ड फिटमेंट म्हणून 56 इंचीच्या आकारात येते.
* 10° स्टीयरिंग अँगल ऍडजस्टमेंटसह रिअर एक्सल स्टीयरिंग ऑफर करते.
* मर्सिडीज बेंझच्या ग्राहकांसाठी प्राधान्याने डिलिव्हरी
* 2 वर्षे किंवा 30,000 किमीचे सर्व्हिस इंटरव्हल अंतराल | 3 वर्षे वाहन वॉरंटी अमर्यादित किलोमीटर्ससाठी 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी
* सर्व्हिस इझ मेंटेनन्स पॅकेजची किंमत रु. 1 लाख इतक्या कमीत कमी किंमतीपासून सुरू होते.
* EQS सर्व्हिस प्रदान करण्याच्या हेतूने मर्सिडीज बेंझ इंडिया उच्च-व्होल्टेज ईव्हीमच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विशेष साधने, उपकरणे आणि सर्टिफाईड टेक्नीशियन्सयुक्त सर्वात मोठे लक्झरी कार नेटवर्क प्रदान करते.
* मर्सिडीज बेंझ EQS 5804MATIC रु. 1.55 कोटीच्या (भारतभरात एक्स-शोरूम) किंमतीत लाँच करण्यात आली आहे.