“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा” मसाप पिपंरी चिंचवड तर्फे आनंदोत्सव……

0
86

पिंपरी, दि. 08 (पीसीबी) :  केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी अस्मिता जपणाऱ्या प्रत्येक मनाला आनंदित केले. अशा प्रत्येक मनाच्या मागे मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते फुगे आकाशात सोडून तसेच साखर व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, तळेगाव-अंबर चे संपादक सुरेश साखवळकर, मसाप देहू शाखेचे अध्यक्ष दत्तात्रय अत्रे,मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, संभाजी बारणे तसेच इतर मान्यवर साहित्यिक मंडळी उपस्थित होती.
त्यासाठी मसाप पिंपरी चिंचवड ने आनंदोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. सनई चौघडाच्या जल्लोषात, “मराठी भाषेचा विजय असो” अशा घोषणा देत निगडी येथील मसाप शान्ता शेळके सभागृहापासून निघालेल्या मिरवणुकीत पिंपरी चिंचवड, तळेगाव, देहू येथील साहित्यिक, वाचक, रसिक या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. सर्वाँना त्यावेळी साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

सभागृहात झालेल्या कार्यक्रमात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी तसेच मराठी मायबोलीच्या कविता व गाणी म्हणण्यात आली.  मराठी भाषा ही अभिजात होतीच परंतु त्यास अभिजात भाषेचा दर्जा यासंबंधी राजमान्यता मिळाल्यानंतर मराठी माणसाची जबाबदारी वाढली असून मराठीचे जतन आणि संवर्धन करता असतानाच, व्याकरणाचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत प्रभुणे यांनी व्यक्त करताना या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पिपंरी चिंचवड शाखेचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रामुख्याने नमूद केले. केले. सुरेश साखवळकर दत्तात्रय अत्रे, श्रीकृष्ण पुरंदरे, बाळकृष्ण अमृतकर, कांचन नेवे, प्रतिमा काळे, प्राची देशपांडे, सुनीता बोडस तेजश्री पाटील यांनी मनोगतात मराठी भाषेला अभिजात भाषा अशी राजमान्यता मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.  राजन लाखे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर होत पर्यंत २०१२ पासून त्यासाठी मसाप पिंपरी चिंचवड ने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला