पिंपरी, दि. २( पीसीबी ) –छत्रपती शिवाजीमहाराज यांना स्वराज्य स्थापनेसाठी सहकार्य करणारा अठरापगड जातीत विभागलेला सर्व जाती धर्मातील मावळा एकत्र करण्यासाठी, सामाजिक समता, सलोखा निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यास संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सर्वच परिवर्तनवादी शिवप्रेमी, संविधान प्रेमी संघटनांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असे प्रतिपादन जिजाऊ रथयात्रेचे प्रमुख व मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक प्रा.अर्जुन तनपुरे यांनी केले.पिंपरी चिंचवड शहरात जिजाऊ रथयात्रे निमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.रत्नप्रभा सातपुते यांनी जिजाऊ वंदना सादर केली.यावेळी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी प्रास्ताविक केले.काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धिकभाई शेख, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव, हरियाणा मराठा सेवा संघाचे मांगिराम चोपडा, प्रा.रामकिशन पवार यांनी मनोगत व्यक्त केले.वरील मान्यवरांसह मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संघटक मनोज गायकवाड,संतोष शिंदे,
जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष सुलभा यादव विचारपीठावर उपस्थित होते.मराठा सेवा संघाचे कार्य समाज जोडण्याचे असल्यामुळे आम्ही सर्व शिव शाहू फुले आंबेडकरवादी कार्यकर्ते बरोबर राहून विषमतेच्या विरोधात आवाज उठवू असे मत अध्यक्षीय भाषणात मानव कांबळे यांनी व्यक्त केले. 18 मार्च रोजी वेरूळ येथून निघालेली जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात हजारो किलोमीटर फिरून बुधवार दि.30 एप्रिल रोजी डांगे चौक थेरगाव या ठिकाणी आली.त्या वेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंग, हलकी वाल्यांनी हलगी वाजवून तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत रथयात्रेचे जोरदार स्वागत केले.यावेळेस काळूराम बारणे , मारूती भापकर, पांडुरंग परचंडराव, धनाजी येळकर, सिद्धिकभाई शेख, सदाशिव लोभे, श्रीकांत गोरे, दिलीप कैतके , वाल्मिक माने उपस्थित होते.जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी जिजाऊंना पुष्पहार अर्पण केला.तसेच छ.शिवाजीमहाराज यांना अभिवादन करण्यात आले.यानंतर चाफेकर चौकात आमदार उमा खापरे, चैताली भोईर, सागर चिंचवडे,सुनिता शिंदे, माणिक शिंदे, शितल घरत यांनी रथयात्रेचे स्वागत केले.यावेळेस छ.शिवाजीमहाराज, जिजाऊ व चाफेकर बंधूंना अभिवादन करून यात्रा चिंचवड स्टेशन येथे पोहचली.यावेळेस मारूती भापकर, वसंत पाटील, अश्विनी पाटील, मनिषा हेंबाडे, वृषाली साठे यांनी स्वागत केले.मोरवाडी चौकात आमदार शंकर जगताप, प्रा.नामदेवराव जाधव, अभिषेक बारणे यांनी राजमाता अहिल्यादेवी व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून रथयात्रेचे स्वागत केले.नेहरूनगर येथे पायी रॅली काढून विवेक गायकवाड व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत केले.छ. शिवाजीमहाराज पुतळा लांडेवाडी येथे राजेश सातपुते , प्रकाश बाबर यांनी स्वागत केले.पी.सी.एम.टी.चौक भोसरी येथे मा.नगरसेवक रवि लांडगे, आप्पा चांदवडे , डॉ.शिवाजीराव ढगे, अभिमन्यू पवार यांनी स्वागत केले.यानंतर रथयात्रा संततुकारामनगर येथे पोहचली असता जिजाऊ ब्रिगेड च्या सुलभा यादव, वर्षा जगताप यांच्या सह शेकडो महिलांनी रांगोळी काढून फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत केले.यावेळेस मा.नगरसेवक बबनराव गाडवे, अॅड लक्ष्मण रानवडे, दिलीप गावडे , मायला खत्री, अशोक सातपुते, मोहन जगताप, प्रकाश बाबर, सुरेश इंगळे, झुंबर जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले.पेढे वाटून आनंद व्यक्त केला.यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात सभा घेण्यात आली.रथयात्रे च्या स्वागताचे नियोजन मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, प्रकाश जाधव, वसंत पाटील, दिलीप गावडे, प्रकाश बाबर , अशोक सातपुते, अॅड लक्ष्मण रानवडे, मोहन जगताप, संभाजी ब्रिगेड चे प्रविण कदम, सतिश काळे ,सदाशिव लोभे, श्रीकांत गोरे, ज्ञानेश्वर लोभे, नकुल भोईर तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या सुनिता शिंदे, मनिषा हेंबाडे, सुलभा यादव, माणिक शिंदे, वृषाली साठे, शितल घरत , नंदा शिंदे, शोभा जगताप, उज्ज्वला साळुंखे, अश्विनी पाटील, हेमा गयानी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले.समारोप सभेचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले तर आभार मनोज गायकवाड यांनी मानले.