मराठा सेवा संघाचे कार्य नव्या पिढीने पुढे न्यावे-पुरूषोत्तम खेडेकर

0
2

स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याबद्दल ममता औटी यांचा मराठा सेवा संघाने केला सत्कार

दि१३(पीसीबी)-पिंपरी चिंचवड शहर मराठा सेवा संघाने संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे पिंपरीत आयोजन केले होते.यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय सहाय्यक/ विक्रीकर निरीक्षक परीक्षेत मुलींमधे राज्यात दुसरी आल्याबद्दल ममता शशिकांत औटी हिचा सत्कार पुरूषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शक अर्जुन तनपुरे,प्राचार्य रामकिशन पवार,प्रकाश जाधव,शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे,अभिमन्यू पवार, जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षा सुलभा यादव, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर, अॅड लक्ष्मण रानवडे,सुनिता शिंदे, माणिक शिंदे,मंचक जाधव, संभाजी ब्रिगेड चे सतिश काळे, प्रविण कदम, गणेश दहिभाते, दिलीप गावडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना ममता औटी यांनी अपयशाने खचून न जाता जिद्दीने चिकाटीने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन केले.मध्यमवर्गीय कुटुंबातील असले तरी आईवडिलांच्या भक्कम पाठिंब्यामुळे, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तसेच जिजाऊंच्या प्रेरणेने यश मिळाल्याची भावना औटी यांनी व्यक्त केली.याप्रसंगी आबासाहेब ढवळे, सुलभा यादव, प्रविण कदम, अर्जुन खामकर यांनी आपला कार्यअहवाल मांडला तसेच पुढील काळात करीत असलेल्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली.

उद्योजक कक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन व मराठा सेवा संघाचे विभागीय अधिवेशन आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येईल असे सांगितले. विभागीय अध्यक्ष प्राचार्य रामकिशन पवार यांनी मराठा सेवा संघाचे मावळ तालुका अध्यक्ष पदी संजय ठाकर यांची निवड जाहीर केली.संजय ठाकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाचे शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे कार्य एकूण तेहतीस कक्षात सुरू असून ते आता नव्या पिढीने जोमाने पुढे न्यावे असे आवाहन मराठा सेवा संघ संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले.

कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच कठिण परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून यश मिळाल्याबद्दल ममता औटी हिचे कौतुक केले तसेच समाजातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेत तसेच उद्योग व्यवसायात यश प्राप्त करावे असे विचार व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांनी मराठा सेवा संघ महाराष्ट्र तसेच देशभरात इतर 67 देशात कार्य करत असल्याचे सांगितले.सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले तर आभार अभिमन्यू पवार यांनी मांडले.