मराठा समाजाचे पिंपरीत साखळी उपोषण सुरू.

0
613

शहरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार.

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे साखळी उपोषणास सुरुवात गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव विविध आंदोलने करीत आहे परंतु आजवर कोणत्याही सरकारने मराठा समाजास कोर्टात टिकणारे आरक्षण दिले नाही.

याचाच एक भाग म्हणून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले द्यावेत या व इतर मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते त्या उपोषण स्थळी पोलीस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज केला होता. उपोषण उधळण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक मागे हटले नाहीत यानंतर सरकारच्या वतीने विविध मंत्र्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली सर ते शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण स्थळी येऊन मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की तुमच्या सर्व मागण्या मान्य करतो मला तीस दिवसाची वेळ द्या मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला दहा दिवस वाढवून 40 दिवसाची वेळ दिली व उपोषण मागे घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मराठा समाजास गेल्या 40 दिवसात मराठा समाजास आरक्षण दिले नाही मराठा समाजाची फसवणूक केली तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा फसवणूक केली याचा निषेध करण्यासाठी व मराठा समाजाच्या आरक्षणा ची मागणी मान्य करावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बुधवार दिनांक 25 ऑक्टोंबर पासून पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्या यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवार 25 ऑक्टोंबर पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे साखळी उपोषणास सुरू करण्यात आले आहे या साखळी उपोषणास मराठा समाज बांधवांनी व इतर समाजाच्या संघटनांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे यावेळी मानव कांबळे,सचिन चिखले,मारुती भापकर,प्रकाश जाधव,अजिज शेख,अँड.वंदना जाधव,अँड.लक्ष्मण रानवडे,काशिनाथ जगताप,सतिश चांदेरे धनाजी येळकर,राजन नायर यांनी मनोगते व्यक्त केले या दिवशी सतीश काळे,वैभव जाधव,लहू लांडगे,मिराताई कदम,नकुल भोईर,अभिषेक म्हसे,प्रतिभा भालेकर,ज्योती जाधव,उमेश जमदाडे,गणेश जाधव यांच्यासह अनेक बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.

यावेळी शोभा जगताप,सुनिता शिंदे,स्मिता म्हसकर,रवींद्र चव्हाण,दिलीप काकडे,अलका भालेकर,दिपक मोहिते,निलेश भदाले,संतोष शिंदे,अशोक सातपुते,देवराम कोठारे,जयराम नानेकर,सुवर्णा कुडपणे,कंचन काळोखे,यांच्यासह अनेक महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.