मराठा समाजाचे उमेदवार, गावागावात बैठका सुरू

0
180

मावळ, दि. १८ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन सुरु करण्यात आहे. राज्य सरकारने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही. यामुळे मराठा समाजाने गावागावत बैठका घेणे सुरु केले आहे. या बैठकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर घेता येणार नाही.

मावळ लोकसभेसाठी उमेदवार देणार
मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज उमेदवार देणार आहे. राठा समाजाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. आता दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे. त्यासाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे.

राज्य सरकारकडून फसवणूक
राज्य सरकारने गाजर दाखऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपला सरकारला हिसका दाखवायचा आहे. दरम्यान प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ, कर्जत मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव हा उमेदवारांना दिसून येणार आहे.