मराठा क्रांती मोर्चाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे…….

0
291

जुन्नर, दि. १३ (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. खेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाकडून गेल्या बारा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सकाळी जुन्नरला जाताना आणि जुन्नर वरून पिंपरी चिंचवड कडे येताना उपोषणस्थळी येऊन मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळं संतापलेल्या मराठा क्रांती मोर्चाने बावनकुळे आणि पाटलांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. ताफ्यातील पोलिसांनी तातडीनं या सर्वांना बाजूला करून, ताफ्याला वाट करून दिली. ताफ्यात बावनकुळे आणि मंत्री पाटील दोघे ही होते, असा दावा आंदोलन कर्त्यांनी केला.