मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त भागात शालेय साहित्याचे वाटप

0
77

दि . १० ( पीसीबी ) – निसर्ग कधी कोपेल हे सांगता येत नाही. नुकतेच मराठवाडा भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावं जलमय झाली आहेत. शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले असून आणि शेकडो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. अनेक ठिकाणी पावसामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे आजघडीला मराठवाड्याच्या मदतीला धावून जाणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुरामुळे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, पुस्तके, वह्या, बॅगा पाण्यामुळे खराब झाल्या असून त्याचा त्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम झाला आहे. या जाणिवेतूनच डॉ प्रशांत देशमुख, चित्रा ज्ञानेश्वर, सचिन सापते या दानशूर व्यक्तींनी देखील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी ही मदत मराठा क्रांती मोर्चाच्या सहकार्यातून सामाजिक बांधिलकी जपत, कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग,वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना नव्या उत्साहाने पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा होता. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे तसेच सहकारी गणेश दहिभाते आणि नकुल भोईर यांनी ही मदत तांदुळवाडी येथे पोहोचवली.
या प्रसंगी अतुल गायकवाड, काकासाहेब जाधव, जावेद भाई सौदागर, विलास गुंठाळ, अक्षय मुळीक, विक्रम चोंदे, विशाल यादव, शशिकांत पाटील, भास्करराव पाटील माजी उपसरपंच नितीन काळे ग्रा.पं. सदस्य बालाजी डीकले, माधव पाटील शिक्षण समिती अध्यक्ष, शंभू खोसे, सुदर्शन काळे, हरिश्चंद्र भालेकर, अभिजीत काळे, पांडुरंग डीकले, धम्मदीप माने, प्रशांत काळे, सुधीर माने, वैभव काळे, प्रदीप डीकले, संकेत डीकले आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने, तसेच आगरकर मॅडम आणि सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
हा उपक्रम म्हणजे समाजातील एकमेकांप्रती असलेली जबाबदारी आणि संवेदनशीलता दाखवणारा सुंदर आदर्श ठरला आहे.