मराठा क्रांती मोर्चाचा धसका; नेत्यांनी दौराच कैला रद्द!

0
274

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड शहरात कुठल्याही नेत्याला सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, त्यांना फिरकू देणार नाही असा इशारा सकल मराठा बांधवांकडून देण्यात आला होता. यातच धाराशिव फाउंडेशनच्या एका कार्यक्रमानिमित्त धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच कळंब तालुक्याचे आमदार कैलास घाडगे-पाटील हे पिंपरी चिंचवड शहरात आज (दि.२९) रोजी येणार होते. परंतू मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधानंतर अखेर त्यांनी शहराचा दौरा रद्द करीत असल्याचे जाहीर केले.

याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप तीव्र होत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप तीव्र होत आहे. उपोषण,मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीला बळ देतानाच राजकीय नेत्यांविरोधात गावबंदीचे तट अधिकच भक्कम होऊ लागले आहेत. याचा फटका राज्यातील अनेक नेत्यांना बसला आहे. यातच मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये साखळी उपोषण सुरू असून पुढारी आणि नेत्यांना आम्ही शहरात कुठलाही कार्यक्रम किंवा सभा घेऊ देणार नाही, असा इशारा दिला गेला होता. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात भेट देण्यास आले होते.यावेळी त्यांनाही आंदोलनकर्त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले होते

दरम्यान, धाराशिव फाऊंडेशनच्या वतीने ‘सन्मान कर्तुत्वाचा, स्नेह मेळावा आनंदाचा’ अशा आशयाने धाराशिव जिल्ह्याचा स्नेह मेळावा हा पिंपरी चिंचवड शहरातील थोपटे लॉन्स या ठिकाणी आज रोजी रविवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी सायं.०५ वा. स्नेह आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच कळंब तालुक्याचे आमदार कैलास घाडगे-पाटील उपस्थित राहणार होते. परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात सर्वच राजकीय नेत्यांचा सभा मेळावे घेण्यास क्रांती मोर्चाने विरोध केला असल्याने या इशाऱ्याचा धसका घेत या नेत्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत असून आम्ही पिंपरी चिंचवड शहराचा दौरा रद्द करीत असल्याचे व्हिडिओ चित्रफितीद्वारे जाहीर केले आहे.