मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक

0
401

मुंबई,दि.०२(पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, जालन्यांचे प्रकऱण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या चांगलेच अंगलट येणार असे दिसते. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी या घटनेवर फडणवीस यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच अन्य पदाधिकारी आंदोलनातील जखमींना भेटण्यासाठी जाणार आहेत. श्रीमंत छत्रपती संभाजीराजे हे सुध्दा या प्रकरणात सरकारवर भडकले असून मराठ्यांवर गोळी झाडायची तर ती प्रथम माझ्यावर झाडा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.