मराठा उपोषणावर लाठी चार्ज प्रकरणातील पोलीस अधीक्षकाला बक्षीसी

0
345

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली.

त्यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आम्हाला मारल्याचे त्यांना बक्षीस मिळाले असेल. निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन .त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही असे ते म्हणाले. ते कल्याण मधील जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत तर तो मधला माणूस कोण हे शोधलं पाहिजे. लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शोधून काढावे अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे यावेळी जरांगे पाटलांनी सांगीतले.

माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती
माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नसतो वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही अशी जरांगे पाटलांनी दिली.