मराठा आरक्षण आंदोलनावर कोणी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये – मुख्यमंत्री शिंदे

0
180

नागपूर, दि. १९ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधीमंडळात निवेदन करीत आहेत. शिंदे म्हणाले, आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे, ते देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा काही अपप्रवृत्तींनी गैरफायदा घेऊ नये, याचा विचार सर्वांनाच करावा लागेल.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, राज्यात समाजिक शांतता राहिले पाहिजे आणि बंधूभाव टिकला पाहिजे. आपण सगळ्यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, याची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहातं. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व घटकाला मी शांततेचं आवाहन करतो. कारण चर्चेतून मार्ग निघतो, हे आपण मागेही बघितलं आहे.

जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी मी स्वतः आंतरवाली सराटीला गेलो होते. त्यांची मागणी कुणबी नोंदींसंदर्भातील होती. त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही. मराठा समाजाच्या नोंदी सापडत असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. कुणबी नोंदींसंदर्भातला निर्णय जुनाच आहे. परंतु कुठे प्रमाणपत्र दिलं जात नव्हतं. तो देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.