मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या कुटुंबात नाही एकही कुणबी नोंद

0
164

जालना, दि. ३ (पीसीबी) – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या कुटुंबात आणि जेथून आंदोलनाची सुरुवात झाली त्या अंतरवाली सराटी येथे एकही कुणबी नोंद मिळाली नाही. अंबड तालुक्यात केवळ १२ गावांमध्ये १२७ नोंदी आढळल्या.जरांगे यांचे मुळगाव आणि अंतरवाली सराटी येथे नोंदी आढळल्या नाहीत.

मनोज जरांगे म्हणाले, मिळाल्या नाहीत की जाणूनबुजून मिळाल्या नाहीत हा मोठा प्रश्न नाही. पण आम्ही हटणार नाही. राज्यातील आमचाच समाज आहे. त्यांचे कल्याण होईल. एकही इंच आम्ही मागे हटणार नाही.

मी स्वार्थी बणनार नाही. माझ्या समाजातील लेकरांना आरक्षण मिळत आहे. मराठे आता मुंबईतून आरक्षण घेऊन येणार. सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. दरम्यान मुख्यमंत्री आणि दोनी उपमुख्यमंत्री यांची मनोज जरांगे यांच्यासोबत बैठक सुरु आहे. शिंदे समितीकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. हैदरासोबत कुणबी नोंदी मिळण्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. तसेच पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरु आहे. प्रमाणपत्र तपासण्याच काम ८५ टक्के पूर्ण झालं, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.