सतीश काळे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध
दि.११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे चिंचवड विधानसभेसाठी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत मराठा आरक्षणासह धनगर,मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सोडवणार महिला सुरक्षा देणे, वाहतूक समस्या सोडवणे,प्रदूषण कमी करणे तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सतीश काळे यांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे रविवार (दिनांक १० रोजी) भोईर व्यायामशाळा चिंचवड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सतिश काळे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव डाॅ. मोहन पवार अँड सुजित बाकले,योगेश पाटील संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष दिनेश मराठे सचिव विशाल मिठे उपाध्यक्ष संघटक प्रशांत चव्हाण मराठवाडा रहिवासी संघटनेचे चंद्रहर्ष सावंत,प्रमोद भातलवंडे, ज्ञानेश्वर साळुंके,गणेश पवार,परमेश्वर शेळके,बालाजी पवार इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. याच बरोबर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करणे नद्या स्वच्छता करणे प्रदूषण कमी करणे बालवाडी ते पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत करणे इत्यादी अनेक आश्वासने काळे यांनी जाहीरनाम्यात दिली आहेत. सतीश काळे हे मूळचे मराठवाडय़ातील असून गेल्या वीस वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत.मराठा आरक्षण,महिला अत्याचार, आरोग्य सुविधा इत्यादी विविध विषयांवर काळे यांनी आजवर शेकडो आंदोलने केली आहेत.काही वेळेस तुरुंगात सुद्धा समाजासाठी गेले आहेत. समाजाच्या विविध वर्गातून काळे यांना मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.