मराठा आरक्षणाची घोषणा आता कोणत्याही क्षणी

0
522

महाराष्ट्, दि. ३० (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भात राजकारण तापलेले आहे. मंत्रीमंडळ बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते, असे राज्यमंत्रीमंडळाचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा निर्णय जाहीर कऱणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्याने त्यांना उपचाराची नितांत गरज असल्याचे समजले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे. या सगळ्या पार्शभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होत आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती घोषणा करणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशात तातडीने आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी मराठा समाज करत आहे. अशातच आता ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे. गावखेड्यापासून राजधानी दिल्लीपर्यंत आंदोलनं उपोषण केलं जात आहे.