मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड बंदची हाक…!

0
367

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – जालना येथील घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात देखील या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. तर कुठे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी टायर पेटवून जालना येथील घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष असल्याचे दिसून येत असून, तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले आहे.

जालना येथील आंदोलकांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड बंदची हाक शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच जालना येथे, मराठा समाजाच्या आरक्षण विषयक मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या लहान मुलांपासून स्त्रियांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज (दि.०३) रोजी दुपारी १२ वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.