मराठा आंदोलकांबद्दल हिंदी अभिनेत्रीची पोस्ट तत्काळ डिलीट

0
5


दि. १(पीसीबी)-ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 4 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील असंख्य मराठा बांधव या आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर अभिनेत्री Sumona Chakravarti हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सनसनाटी आरोप केले होते. मात्र, आता Sumona Chakravarti हिने पोस्ट डिलिट केली आहे.

अभिनेत्री Sumona Chakravarti ने डिलिट केलेली पोस्ट जशीच्या तशी :

Sumona Chakravarti म्हणाली, “आज दुपारी साधारण साडेबारा वाजता मी कुलाब्याहून फोर्टकडे गाडीने जात असताना अचानक गर्दीने माझा रस्ता अडवला. गळ्यात भगवं उपरणं घेतलेला एक माणूस माझ्या कारच्या बोनेटवर हात आपटू लागला आणि चेहऱ्यावर मिश्कील हसू ठेवत होता. त्याने आपल्या पोटाने माझ्या गाडीवर दाब दिला आणि माझ्यासमोर नाचू लागला. त्याच्यासोबतचे इतर लोक माझ्या गाडीच्या काचेजवळ येऊन ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत मोठमोठ्याने हसत होते. आम्ही थोडं पुढे सरकलो, पण काही मिनिटांनी पुन्हा तसंच घडलं. अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने दोनदा हा प्रकार झाला. तिथे कुठेच पोलीस नव्हते, आणि जे दिसले ते निवांत गप्पा मारत बसले होते. कायदा-सुव्यवस्थेचा कुठेही मागमूस नव्हता. दक्षिण मुंबईसारख्या भागात, तेही दिवसाढवळ्या, माझ्या स्वतःच्या गाडीतसुद्धा मला असुरक्षित वाटत होतं,”

तिने पुढे सांगितलं – “रस्त्यांवर सगळीकडे केळ्याच्या साली, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कचरा विखुरलेला होता. पादचारी मार्गावर चालायला जागा नव्हती. आंदोलनकर्ते रस्त्यावर खाणं-पिणं करत होते, झोपत होते, आंघोळ, स्वयंपाक, शौचालयाला जाणं, व्हिडीओ कॉल, रील्स बनवणं, अगदी मुंबईचं पर्यटन करणं सुद्धा सुरू होतं. हे सगळं पाहून नागरी कर्तव्यांची जणू थट्टाच उडवली जात असल्याचं जाणवत होतं.”

“मी लहानाची मोठी मुंबईतच झालेय. विशेषतः दक्षिण मुंबईत मला नेहमी सुरक्षिततेची भावना असायची. पण आज पहिल्यांदाच, इतक्या वर्षांत, दिवसाढवळ्या कारमध्ये बसूनदेखील असुरक्षित वाटलं. माझ्यासोबत मित्र होता म्हणून मी भाग्यवान समजले, कारण मी एकटी असते तर काय झालं असतं याचा विचार करूनही अंगावर शहारे आले. काही क्षण व्हिडीओ काढावा असं वाटलं होतं, पण लगेच लक्षात आलं की त्यामुळे त्यांचा उन्माद आणखी वाढेल. म्हणून मी व्हिडीओ न करण्याचाच निर्णय घेतला,” असं सुमोनाने सांगितलं.

“तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल, कुणीही असाल, तरी कायदा-सुव्यवस्था क्षणार्धात कोसळू शकते, ही जाणीवच धडकी भरवणारी आहे. आंदोलन शांतपणे होऊ शकतं, त्याची अनेक उदाहरणं आपण यापूर्वी पाहिली आहेत. अनेकदा तर पोलिसांकडून दडपणाखाली शांत आंदोलनं थांबवली जातात. पण इथे तर पूर्ण अराजकता होती. कर भरणारी नागरिक, एक महिला आणि या शहरावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला अत्यंत अस्वस्थ वाटलं. शासन व नागरिक जबाबदाऱ्यांची अशा प्रकारे खिल्ली उडवणाऱ्यांपेक्षा आपण चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहोत. आपल्या स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा अधिकार प्रत्येकाला असलाच पाहिजे,” असं Sumona Chakravarti ने स्पष्ट केलं