मराठवाडा दसरा स्नेह मेळावा उत्सवाच्या वातावरणात पार पडला

0
266

शाहुनगर, दि. ८ (पीसीबी) – मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर पिंपरी चिंचवड पुणे महानगरातील मुळ मराठवाडा येथील रहिवाशी बंधु भगिनींचा भव्यदिव्य मराठवाडा दसरा स्नेह मेळावा बुधवार दि ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पिरॅमिड हॉल शाहुनगर येथे आनंदच्या व उत्सवाच्या वातावरणात पार पडला.भेटीगाठी आपली माती आपली माणसं या भुमिकेतुन  सर्वजण एकत्र जमली होती. मराठवाडा दसरा मेळाव्याच वेगळेपण म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवात स्त्री शक्ती गौरव केला जातो म्हणुन मेळाव्याच उद्घाटन महिलांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन अमर जवान स्मारक प्रतिकृतीला मानवंदना देऊन करण्यात आले.

मराठवाडा भुमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पुणे यांच्या वतीन आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तान तीन ठराव संमत करून घेण्यात आले पहिला ठराव शहिद भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरु यांच्या बलिदान दिन २३ मार्च २०२३ रोजी आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथे देशभक्तीवर आधारीत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करणे. दुसरा ठराव मराठवाडा मुक्ती संग्राम ७५ व्या वर्षा निमित्त १७ सप्टेंबर २०२३ रोजी बालेवाडी स्टेडियम पुणे येथे ७५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून मानवंदना देणे व देशभक्तीपर कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करणे आणि तिसरा ठराव पिंपरी चिंचवड महानगरात भव्य दिव्य सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभा करणे. मराठवाडा दसरा मेळाव्याच साधे पण असे होते कोणत्याही व्यक्तीचा  सत्कार करण्यात आला नाही. सर्व जणान आपलस वाटव यासाठी सर्व जण हॉल मध्ये भारतीय बैठकीत गप्पा गोष्टी करत चर्चा करत सूसंवाद करून विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सवा मुळे महिलांचा तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

मराठवाडा मुक्ती संग्राम माहितीच्या प्रदर्शनाचे आयोजन पिरॅमिड हॉल मध्ये नितीन चिलवंत व जीवन बोराडे यांनी केले होते या मधुन मराठवाड्यावर ज्या हैद्राबाद संस्थानाच्या ७ निजामाची राज्य केलं होतं त्याची सविस्तर माहिती देण्यात आली होती, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रनेते स्वामी रामानंद तीर्थ ,गोंविदभाई श्रॉफ व स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो लावण्यात आले होते. खर तर दसऱ्याच्या निमित्तान सोनं एकमेकांना देण्यात आले व आनंदान एकमेकांची विचारपुस करत होते. अशा पध्दतीन दसरा सण साजरा केला .

या कार्यक्रमासाठी मराठवाड्याचे भुमिपुत्र या नात्यान पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती या मध्ये मा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उद्योजक अरुण पवार,व्यंकटराव शिंदे,  गोरख भोरे,बाळासाहेब काकडे, नरेंन्द्र माने, गोपाळ माळेकर, प्रशांत जाधव, डी. एस. राठोड, अभिमन्यु पवार, प्रल्हाद लिपने,तुकाराम गोंगाने, सुनील भोसले,जीवन बोराडे, नितीन चिलवंत,सतीश काळे,रामहारी केदार, मुंजाजी भोजने,मारुती बानेवार,शिवकूमार बायस, गणेश खरात,विजय घोडके,राजेंद्र गाडेकर,मनोज मोरे,प्रियंका बोराडे, रेश्मा चिलवंत, सुजाता पानपट,शिल्पा बोराडे,सारिका शिंदे, डॉ.प्रीती काळे,वैशाली बोराडे, गीतांजली बोराडे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.