मराठवाडा जनविकास संघ व विविध संस्थांची पूरग्रस्तांना मदत

0
2

पिंपरी,दि.१८(पीसीबी)-मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये ‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून अत्यावश्यक मदतीचे मोठे कार्य हाती घेण्यात आले असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली एक हजार पुरग्रस्त कुटुंबांना धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे थेट गावा-गावांत जाऊन वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळी, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश आहे.


बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यात तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर, प्रकाश इंगोले, शाहूराज कदेरे, युवराज माने, संजय माने, गोकुळ शितोळे संतोष भोरे, गणेश गंगाविठ्ठल, विवेक पाटील, सुशांत क्षीरसागर, अशोक भोरे, शंकर तांबे, संतोष तांबे, मनोज मोरे, चंद्रकांत मोरे, सतिश मुरकुटे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ‘शालेय साहित्य’ मदतीची गरज :
पूरग्रस्त भागात अन्नधान्य व कपडे मिळाल्याने जगण्याचा आधार मिळाला असला, तरी परिस्थिती पाहता आता शालेय साहित्याची तीव्र गरज जाणवत आहे. पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको, या विचारातून मराठवाडा जनविकास संघाने आता ‘मन आणि बुद्धी पोसली पाहिजे’ या उद्देशाने शालेय साहित्य संकलनाचा नवा संकल्प केला आहे. अरुण पवार यांनी विविध देवस्थाने, प्रार्थनास्थळे आणि मंदिर ट्रस्टला या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली आहे. येत्या ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य, गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, स्टेशनरी यासारख्या साहित्याचा पूर्ण संच घेऊन मदत टेम्पो रवाना होणार आहे. नागरिकांनी या ‘यज्ञात फूल न फुलाची पाकळी’ म्हणून आपल्या इच्छेने मदत अरुण कन्स्ट्रक्शन कार्यालय, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जमा करावी, असे आवाहन अरुण पवार यांनी केले आहे.

विविध संस्थांची पूरग्रस्तांना मदत :
देवगाव (मां), ता. बार्शी, जि. सोलापूर येथे पूरग्रस्तांना अन्नधान्य किटसह साड्या, ब्लँकेट्स, मोठ्या चटया आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. देवगाव (खु.), ता. परांडा, जि. धाराशिव येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आसन पट्टी, टेबल, फॅन, वाचनालयासाठी विविध गोष्टी आणि वैचारिक पुस्तके, नकाशे, पृथ्वीचा गोल, ट्यूबलाइट, मोठ्या प्रमाणावर स्टेशनरी साहित्य, रजिस्टर, डस्टर, मुलांसाठी पाण्याची बॉटल, स्टीलचे ग्लास, माईक, रायटींग पॅड, कंपास आणि स्कूल बॅग्ज यांचा समावेश होता.

घरकुल विभाग चिखली, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे गुरव, राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपळे गुरव, दत्त मंदिर पिंपळे गुरवचे शंकर कदम, ॲड. प्रतापराव साबळे एस पीज हास्ययोग परिवार, सुदीक्षा फाऊंडेशन, उमा गोपाळे विश्वनाथन, सुमन संभाजी गोपाळे, मुक्ता अतुल दरेकर, श्रुती सतीश पाटील, धनाजी येळकर पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवार शाखा क्रमांक 70 (मारुती घुगे) यांच्यावतीनेही मदत करण्यात आली. यावळी कॅप्टन बालाजी पांचाळ, प्रणव खलाटे, किशोर आटरगेकर, देवगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, अभिजीत शिंदे, कुबेर शिंदे, गटशिक्षण कार्यालयाच्या गोरे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ही मदत शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहूराज कदेरे, प्रकाश इंगोले यांचे सहकार्य लाभले. उमर शेख यांनी क्रीडा साहित्य, फॅन, माईक या वस्तूंसाठी आर्थिक मदत केली. मराठवाडा जनविकास संघातर्फे सावळेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर या गावातील शेतकऱ्यांनाही धान्य किटचे वाटप केले.