मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी

0
119

-पूजन करून टँकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाण्याचे पाच वॉटर टॅंकर देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत पाच दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प. बाबुराव महाराज तांदळे, दिंडी क्र.18 कै. ह.भ.प. धोंडूजी बुवा चिझघरकर व श्रीगुरु बंकट स्वामी महाराज विश्वस्त मंडळ दिंडी या पाच दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात येत आहेत.

ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प.बाबुराव तांदळे महाराज आळंदीकर, उद्योजक शंकर तांबे, ज्येष्ठ समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, गणेश ढाकणे, कैलास सानप, हनुमंत घुगे, सतीश काळे यांच्या उपस्थितीत देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपुर या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले.


अरुण पवार म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे. आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित महाराज, संत महंत आणि संस्थांना ५ फुट उंचीची वड, पिंपळ, कडूलिंब, तुळस, हिरडा, बेहडा, करंज, निरगुडी या वृक्षांची ५०० रोपे भेट देण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी साळुंखे, वसंत महाराज गव्हाणे, जयंत हिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम, भीमाशंकर भोसले, सरपंच सोमनाथ दाते, सेवानिवृत्त वननिरीक्षक रमेश जाधव, कवी सुरेश कंक , अण्णा जोगदंड, सुग्रीव पाटील, विकास आघाव, उमाकांत सानप, मुख्य प्रशासकीय अधिकारी ससून रुग्णालय गोरोबा आवटे, अनुराग दूधभाते, संतोष नलावडे, संतोष पाटील, अलकाताई जोशी, ऍड.अतुल पाटील, केशव बोधले, किशोर आटरगेकर, सूर्यकांत कुरुलकर, सखाराम वाळकोळी, वामन भरगंडे, युवराज नलावडे, नितीन चिलवंत, शिवकुमार बायस, अमोल लोंढे,
ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण फिरके, चांदमल सिंघवी, सुरेश दिघे, गोपाल नंदनवार, डॉ. मडकी, दत्तात्रय इंगळे, ॲड. किरण सावळे, राजेंद्र वाघ, योगेश सोनवने, बळीराम माळी, संदिप पाटील, प्रकाश इंगोले, सतीश काळे, हनुमंत घुगे, केशव बोधले, अतुल पाटील, शंकर नानेकर, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त करते बाळासाहेब साळुंके ,काळुराम लांडगे, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, संगिता जोगदंड, हनमंत पंडीत, राजशेखर लद्दे, तानाजी काटे, श्री भाऊसाहेब, भगवान चव्हाण, सौ.चव्हाण, मीनाक्षी खैरनार, शोभाताई माने, संजना करंजवणे, उद्योजक बाळासाहेब काकडे, शोभा माने, मीनाक्षी खैरनार, सिंधू पाटील, गुलाब गायकवाड, दिलीप शेलार आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन बळीराम माळी यांनी, तर आभार ज्येष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांनी मानले.