मरकळ येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा, पोलीस येताच आरोपी पसार

0
318

खेड, दि. १५ (पीसीबी) : खेड तालुक्यातील मरकळ येथे एका दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ही कारवाई गुरुवारी (दि. 14) मध्यरात्री पावणे दोन वाजता करण्यात आली.

राजू छोटेलाल पटेल (वय 41, रा. डुडुळगाव, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू याने बेकायदेशीरपणे मरकळ गावात दारू भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आळंदी पोलिसांनी मध्यरात्री दारू भट्टीवर कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी तिथून पळून गेला. पोलिसांनी 4 लाख 58 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.