मनोज लोहिया पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त

0
500

 

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या केल्या आहेत. गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या पदस्थापनेमध्ये आज बदल करण्यात आला आहे. यामध्ये रवींद्र शिसवे, मनोज लोहिया, अमिताभ गुप्ता, रंजन कुमार शर्मा यांच्यासह आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मानवी हक्क विभागाचे विशेष मूळ पोलीस महानिरीक्षक असलेले रवींद्र शिसवे यांची बदली आता पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई या पदावर झाली आहे. तसेच मनोज लोहिया यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र येथून पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अमिताभ गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई येथून आता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर रंजन कुमार शर्मा यांची अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा बृहमुंबई ऐवजी आता अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व) पुणे शहर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्यातील वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा बदल्यांचे सुधारीत पत्र काढत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या केल्या आहेत. एका आठवड्यातच पोलीस अधिकाऱ्यांच्या दोनदा बदल्या करण्यात आल्याने सरकारचा बदल्यांचा घोळ काही संपताना दिसत नाहीये.

सुधारीत पत्रानुसार, सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र या ऐवजी आता विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेश कुमार मेंगडे यांची पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार येथून मुख्य दक्षता अधिकारी सिडको, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय मोहिते यांची पोलीस सह आयुक्त नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सुहास वारके यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय दराडे अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.